Tuesday, March 15, 2022

काय होते बाबासाहेब.... मालिका वात्रटिका

































मालिका वात्रटिका
-----------------

काय होते बाबासाहेब...... 

दीन,दलित,गोरगरीबांची
आई होते बाबासाहेब .
पिचलेल्या,ठेचलेल्यांची
दाई होते बाबासाहेब

दाबलेल्या आवाजाचा
हुंकार होते बाबासाहेब.
तार नसलेल्या विणेचा
झंकार होते बाबासाहेब.

प्रयत्न..प्रयत्न...प्रयत्न
यशस्वी प्रयत्न होते बाबासाहेब.
मोजून मोपून सांगायचे तर 
अक्षरश: चौदावे रत्न होते बाबासाहेब.

अंधाराला प्रकाशाशी जोडणारी
नाळ होते बाबासाहेब.
दांभिकतेच्या कानाखालचा
जाळ होते बाबासाहेब.

प्रज्ञा,शील,करूणेचे
बीज होते बाबासाहेब.
सुभेदार रामजींच्या कष्टाचे
चीज होते बाबासाहेब.

बुद्ध,कबीर,फ़ुलेंचा
सार होते बाबासाहेब.
लवलवत्या लेखणीची
धार होते बाबासाहेब.

निद्रिस्त लाव्हा पाहून
खूप दु:खी होते बाबासाहेब.
संस्कृतीला ढुसण्या देणा्रा
ज्वालामुखी होते बाबासाहेब.

महाडच्या चवदार तळ्याची
निळाई होते बाबासाहेब.
डोळ्यातल्या आभाळाची
जळाई होते बाबासाहेब.

बुद्धांच्या करूणेचा
सागर होते बाबासाहेब.
शाहू महाराजांच्या लढ्याचे
आगर होते बाबासाहेब.

यारांचे यार आणि
दुश्मनांचे मित्र होते बाबासाहेब.
अजिंठा-वेरूळ्च्या लेण्यातील
कोरीव चित्र होते  बाबासाहेब.

मनुस्मृतीला भस्म करणारी
आग होते बाबासाहेब.
शेळपट जिणं नाकारणारे
वाघ होते बाबासाहेब.

सवितेची कविता,
लेकरांची रमाई होते बाबासाहेब.
थकल्या-भागल्या जीवासाठी
प्रेमळ भिमाई होते बाबासाहेब.

किती सांगु?किती नाही?
तरी उरून राहतात बाबासाहेब?
नको नको रे हा नादानपणा
कुठून तरी पाहतात बाबासाहेब !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल -9923847269
-------------------------------------

पूर्वप्रसिद्धी-दैनिक पुण्यनगरी
14 एप्रिल 2008
-------------------------------------

नम्र विनंती-
सदरील कविता सोशल मिडियावर निनावी आणि कुणी स्वतः चे नाव वापरून शेअर करत आहे.आपल्याला असे आढळले तर असे करणारास कल्पना द्यावी
-------------------------------------

वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

https://suryakantdolase.blogspot.in


No comments:

दैनिक वात्रटिका28एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 28एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -326वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QV3qcRHfuL-_Lq3aptAie...