Sunday, March 13, 2022

लेबल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लेबल

जनतेच्या हिताचे सोडून,
स्वहिताचे निर्णय घेतले जातात.
पुन्हा नवीन पापं करण्यासाठी,
आपली जुनी पापं धूतली जातात.

स्वहितालाच जनहिताचे,
लेबल लावून मोकळे होतात !
ज्याला जसे श्रेय घेता येईल,
तसे श्रेय घेऊन मोकळे होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7872
दैनिक झुंजार नेता
12मार्च 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...