Friday, March 4, 2022

वेडगळपणा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
वेडगळपणा
खरे वागून वागून,
दुःखच वाट्याला येते.
खऱ्यापेक्षा जास्त किंमत,
म्हणूनच खोट्याला येते.
खरे काय? खोटे काय?
तुमचे तुम्हीच ठरवू शकता.
कुणाचे लाड पुरवायचे?
तुमचे तुम्हीच पुरवू शकता.
जो वाटतो खरा,
दुनियेत तोच वेडगळ आहे!
व्यावहारिक जगात,
खरेपणा हीच अडगळ आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7862
दैनिक झुंजार नेता
4मार्च 2022

 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...