आजची वात्रटिका
------------------------
दबावतंत्र
कधी कधी आपले अपयशही,
मोठ्या दणक्यात मिरवले जाते.
अपयशाच्या गदारोळात,
दुसऱ्याचे यशही जिरवले जाते.
यश आणि अपयशाची,
अशीच फिरवाफिरवी असते!;
अपयशाच्या मिरवामिरवीत,
अपयशाची जिरवाजिरवी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7871
दैनिक झुंजार नेता
12मार्च 2022
No comments:
Post a Comment