Tuesday, March 15, 2022

पेपरफुटीची केमिस्ट्री...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
पेपरफुटीची केमिस्ट्री
खोट्या गुणवत्तेचा किडा,
जसा डोक्यात स्पायरल होतो.
तसा फुटलेला पेपर मग,
काही क्षणात व्हायरल होतो.
आपला ' क्लास ' दाखवणारे,
संस्था आणि चालक असतात.
लेकरांसाठी वाट्टेल ते,
म्हणणारेही पालक असतात.
याच सगळ्यांची मिळून,
पेपरफुटीची केमिस्ट्री आहे!
परीक्षा कोणतीही असो,
हीच पेपरफुटीची हिस्ट्री आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6437
दैनिक पुण्यनगरी
15मार्च 2022

 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...