आजची वात्रटिका
----------------------------
हास्य कवी संमेलन
कुणी चक्क मालक झाले,
कुणी त्यांचे नोकर झाले.
मानधनाच्या पुडक्यापोटी,
कवी लोक जोकर झाले.
कविता त्यांचा वसा नाही ,
कविता त्यांचा षोक आहे.
त्यांच्या हास्य कविता म्हणजे,
जोक मागून जोक आहे.
रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे
तमाशाबरोबर बतावणी आहे.
कविता म्हणजे चकणा झाली,
पेताडांची पेताडांना,
क्या बात है..ची चिथावणी आहे.
बगलेत आणि पोटाला नको,
जरा मेंदूलाही गुदगुल्या करा !
फक्त हसवा-फसवी करण्यापेक्षा,
लोकरंजनातून लोकप्रबोधनासाठी
आपल्या कविता खुल्या करा!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7876
दैनिक झुंजार नेता
18मार्च 2022
No comments:
Post a Comment