Saturday, March 5, 2022

द्विवर्षपूर्ती.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

द्विवर्षपूर्ती

ते म्हणाले,पुन्हा येईल;
हे म्हणाले,काहीअडले नाही.
ते म्हणाले, लवकरच पडेल,
दोन वर्ष काही पडले नाही.

वाघ म्हणा;वाघोबा म्हणा,
खायचे तेंव्हा खाल्ले जाईल.
आम्ही करून दाखवले,
हे पुन्हा पुन्हा बोलले जाईल.

घड्याळाने साधले टायमिंग,
जरी अटकपार झेंडे आहेत!
कुणी बसले हात चोळीत,
कुणाच्या मनात मांडे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6427
दैनिक पुण्यनगरी
5मार्च 2022

 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...