Monday, March 14, 2022

युद्धकथा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

युद्धकथा

तह केले, युद्धविराम केले,
तरीही अंत बघणे चालू असते.
उठता-बसता फायरिंग करीत,
मिसाईल डागणे चालू असते.

गृहयुद्ध की शीत युद्ध?
पिडीतांना महा डाउट असतो.
सायरन न वाजवताच,
गुपचूप 'ब्लॅक आऊट' असतो.

तो म्हणतो,ती सायको आहे,
ती म्हणते,तो सायको आहे !
या शत्रू पक्षांचे नाव,
नवरा आणि बायको आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6436
दैनिक पुण्यनगरी
14मार्च 2022


No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...