Monday, March 21, 2022

'विमान'दारी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

'विमान'दारी

जुनेच रान पुन्हा,
नव्याने उठवले जाते
पुष्पक विमान आणून,
तुकोबांना सदेह
वैकुंठाला पाठवले जाते.

भाबड्या श्रद्धेपोटी,
पुन्हा जुनेच वर्तन आहे.
शाब्दिक प्रामाण्याचे,
पुन्हा पुन्हा कीर्तन आहे.

वैकुंठगमनाची चिकित्सा,
सोयीस्कर टाळली जाते!
जशी पाळता येईल तशी,
विमानदारी पाळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6442
दैनिक पुण्यनगरी
21मार्च 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...