Wednesday, March 30, 2022

स्टंटबाजीचा तमाशा.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
स्टंटबाजीचा तमाशा
काल होते,उद्याही असतील,
जसे की ते आज आहेत.
राजकीय स्टंट करणारे,
राजकीय स्टंटबाज आहेत.
लोकांनी चर्चा केली की,
स्टंटबाज चेकाळू लागतात.
सवंग प्रसिद्धीमुळे,
स्टंटबाज बोकाळू लागतात.
कुणाची स्टंटबाजी प्रायोगिक,
कुणाची स्टंटबाजी हौशी असते !
जशी मथुरेच्या बाजाराला,
गवळणीसोबत मावशी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6452
दैनिक पुण्यनगरी
30मार्च 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...