आजची वात्रटिका
------------------------
बुरा न मानो....
जिकडे तिकडे बोंबाबोंब,
आपली तूप, आपलीच पोळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
विरोधात बोलल्यावर धाड,
विचारवंतांना तर गोळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
जनतेला वेठीस धरून,
आपापली राजकीय खेळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
हेही म्हातारे,तेही म्हातारे,
खुर्ची पाहून गाली खळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
कशा कशाला आणायचा उत?
सगळी कढीच शिळी आहे!
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6440
दैनिक पुण्यनगरी
18मार्च 2022
No comments:
Post a Comment