Monday, March 28, 2022

लोकभावना.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

लोकभावना

तालुक्याला द्या जिल्ह्याला द्या,
फक्त मुंबईतच काय गल्लीत द्या.
जास्तच पुळका आला असेल तर,
एखादं घर राजधानी दिल्लीत द्या.

आमदारांना मुंबई घर देणार,
यावर प्रतिक्रिया जळजळीत आहेत !
लोकभावना त्यांना समजतील,
खऱ्या अर्थाने जे जे कळीत आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7884
दैनिक झुंजार नेता
28मार्च 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...