Sunday, March 27, 2022

कॉमन अजेंडा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

कॉमन अजेंडा

किमान समान कार्यक्रम,
हा खूप विनोदी भाग आहे.
समान नसतो,किमान नसतो,
याचाच खरा राग असतो.

किमान समान कार्यक्रमात,
मित्रपक्षांचा कार्यक्रम होतो.
आपण सत्तेत की, सत्तेबाहेर?
वेळोवेळी हाच भ्रम होतो.

संयुक्त सरकार मध्ये,
हाच कॉमन अजेंडा असतो !
कुणाच्या हातामध्ये बुडखा,
कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6449
दैनिक पुण्यनगरी
27मार्च 2022
 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...