आजची वात्रटिका
------------------------
आयडियाचा कल्पनाविलास
त्यांची आयडिया सरस आहे,
यांचीही आयडिया सुरस आहे.
एकमेकांना टाकायची,
जणू पक्ष-पक्षात चुरस आहे.
एकमेकांना खुशाल आत टाका,
तुमच्या मनासारखे तरी होऊ द्या !
स्वच्छ चेहऱ्याचे प्रतीक म्हणून,
एखाद्याला तरी बाहेर राहू द्या !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6432
दैनिक पुण्यनगरी
9मार्च 2022
No comments:
Post a Comment