Friday, March 11, 2022

भाजपाचा चौकार...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भाजपाचा चौकार

कुणाला नको तसे लागले,
कुणाला हवे तसे लागले.
शंका घेणारा विचारतो,
निकाल असे कसे लागले?

दिल्ली टू पंजाब,
आपचीच हवा आहे.
भाजपाच्या ताब्यात,
युपी आणि गोवा आहे

काँगेसची झाली हाथ सफाई,
डळमळीत इतरांची नौका आहे!
जिथे मिळाला मोका,
तिथे भाजपाचा चौका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7868
दैनिक झुंजार नेता
11मार्च 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...