Wednesday, March 23, 2022

चौकशीचा सार...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
चौकशीचा सार
ज्यांची सोय व्हायला हवी,
त्यांची गैरसोय व्हायला लागली.
सत्तेच्या सोयाऱ्या-धायऱ्यावर,
टाचेवर टाच यायला लागली.
सोयरे-धायरे,पाहुणे-रावळे,
यांचाच आता पाहुणचार आहे !
नात्यामुळे गोत्यात आले,
चौकशीअंती हाच सार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6445
दैनिक पुण्यनगरी
23मार्च 2022

 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...