आजची वात्रटिका
------------------------
कच्चे तेल
रशिया आणि युक्रेन युद्धाचे,
अटळ परिणाम होऊ लागले.
ज्याला आपण कच्चे खायचे,
ते आपल्याला कच्चे खाऊ लागले.
पेट्रोल आणि डिझेलच्या आगीत,
खायचे तेल पडले हे सिद्ध आहे!
युद्ध नको,शांतता हवी,
असे म्हणणारा मात्र हतबुद्ध आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6438
दैनिक पुण्यनगरी
16मार्च 2022
No comments:
Post a Comment