आजची वात्रटिका
----------------------------
युद्धाचे ढग
कुणाचे मिसाईल फुसके,
कुणाचे मोघम निघू लागले.
सगळे मिसाईल मॅन,
ढगात मिसाईल डागू लागले.
राजकीय युद्धाचे ढग,
आपल्यावरती दाटू लागले!
कुणी कुणाला झेलेनस्की,
तर कुणी पुतीन वाटू लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6447
दैनिक पुण्यनगरी
25मार्च 2022
No comments:
Post a Comment