आजची वात्रटिका
------------------------
संसारिक युद्ध
भांडून भांडून एकदाचे,
जगणे हराम करतात.
तेव्हा कुठे नवरा बायको,
आपला युद्धविराम करतात.
मित्रपक्ष होतो शत्रुपक्ष,
शत्रुपक्ष मित्रपक्ष होतो.
तेव्हा कुठे युद्धाचा,
तात्पुरता सोक्षमोक्ष होतो.
अधून-मधून चकमकी,
शीतयुद्धाचे मोह होतात !
पुन्हा नव्या युद्धापूर्वी,
तेवढ्यापुरते तह होतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6428
दैनिक पुण्यनगरी
6मार्च 2022
No comments:
Post a Comment