Tuesday, March 1, 2022

युद्ध आमचे सुरु... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
युद्ध आमचे सुरु
रशिया -युक्रेन युद्धाने,
ईडीला पडद्याआड केले आहे.
न्यूज चॅनेलमुळे तर,
युद्ध आपल्या घरात आले आहे.
लढणारे लढत आहेत,
दोघेही तसे खमक्या आहेत !
चोवीस तास आपल्यालाच,
जणू अणूयुद्धाच्या धमक्या आहेत !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7857
दैनिक झुंजार नेता
1मार्च 2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026