Sunday, March 6, 2022

पुरस्कार चळ.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पुरस्कार चळ

कामासाठी पुरस्कार नाही,
पुरस्कारांसाठी काम आहे.
नुसत्या कामाने काय होते?
आवश्यक तर दाम आहे.

कामापेक्षा दामावर,
पुरस्कार लाटले जातात.
जेवढे भेटतात गिराईकं,
तेवढे ते वाटले जातात.

वाटावाटी आणि लाटालाटी,
मग कुठे आडकाठी आहे?
पुरस्कारचळ लागला की,
मग साठी बुद्धी नाठी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7864
दैनिक झुंजार नेता
6मार्च 2022

 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...