आजची वात्रटिका
------------------------
फिट्टम फाट
सत्तेवर असले की,
सत्तेच्या तोऱ्यात असतात.
पायउतार झाले की,
चौकशीच्या घेऱ्यात असतात.
कुणी जातात आत,
कुणी मात्र बाहेर असतात !
फिट्टम फाट वाटावेत असे,
चौकश्यांचे आहेर असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7874
दैनिक झुंजार नेता
16मार्च 2022
No comments:
Post a Comment