Showing posts with label फिट्टम फाट.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label फिट्टम फाट.... मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, March 16, 2022

फिट्टम फाट.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
फिट्टम फाट
सत्तेवर असले की,
सत्तेच्या तोऱ्यात असतात.
पायउतार झाले की,
चौकशीच्या घेऱ्यात असतात.
कुणी जातात आत,
कुणी मात्र बाहेर असतात !
फिट्टम फाट वाटावेत असे,
चौकश्यांचे आहेर असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7874
दैनिक झुंजार नेता
16मार्च 2022

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...