Tuesday, March 8, 2022

तिचा हिशोब...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

तिचा हिशोब

8 मार्च जवळ आला की,
तिच्या कपाळावर आठ्या येतात.
पारंपरिक चिंता आणि काळज्या,
8 मार्चला मोठ मोठ्या होतात.

ती नव्याने हिशोब मांडू लागते,
किती 8 मार्च आले गेले?
खोट्या खोट्या कौतुकाशिवाय,
पदरात नेमके काय आले ?

पोपडे कोणीही काढले तरी,
शेवटी तिलाच लिंपून घ्यावे लागते !
8 मार्चचे हार तुरे उतरून,
पुन्हा आहे तिथेच जुंपून घ्यावे लागते!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7866
दैनिक झुंजार नेता
8मार्च 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...