आजची वात्रटिका
----------------------------
अटळ सत्य
राजकीय घराणेशाहीला,
भाऊबंदकीने गाठले म्हणतो.
अत्यंत दुःखद अंतकरणाने,
त्यांचे घराणे फुटले म्हणतो.
त्यांची तहान भागली जाते,
त्यांचीच भूक भागली जातो.
घराण्यातल्या घराण्यातच,
राजकीय सत्ता विभागली जाते.
काहीही झाले तरी,
घराणेशाही टळलेली नाही !
जे हे सत्य नाकारतात,
त्यांना घराणेशाही कळलेली नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7881
दैनिक झुंजार नेता
24मार्च 2022

No comments:
Post a Comment