आजची वात्रटिका
----------------------------
गोबेल्सची घुसखोरी
मीडिया ते सोशल मीडिया,
अगदी सर्वत्रच बसले आहेत.
छोट्या- मोठ्या पडद्यावरही,
आता गोबेल्स घुसले आहेत.
गोबेल्स नीती जशी,
पॉलिटिकल पार्ट झाली आहे.
तशी गोबेल्स नीती आता,
क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे.
फेकालॉजी आणि ठोकालॉजी,
यावर त्यांचा विश्वास गाढ असतो!
गोबेल्स पडद्यावर असेल तर,
हिटलर नक्की पडद्या आड असतो!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6444
दैनिक पुण्यनगरी
22मार्च 20222022

No comments:
Post a Comment