Monday, March 7, 2022

नंदीबैलाचा हंबरडा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
नंदीबैलाचा हंबरडा
तुम्ही खुशाल पिता गोमूत्र,
मला मात्र दूध पाजता का रे ?
हा दांभिकपणा करताना,
तुम्ही थोडे तरी लाजता का रे?
बोळ्याने दूध पिऊन पिऊन,
पुन्हा पुन्हा दूधखुळेपणा आहे!
माझाही तुम्ही ' गणपती ' केला,
हा तर वैचारिक बुळेपणा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7865
दैनिक झुंजार नेता
7मार्च 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...