Thursday, March 10, 2022

पेन ड्राईव्ह.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पेन ड्राईव्ह

जुने गेले,नवे आले,
नवे युग,नवा नारा आहे.
ट्रकभर पुराव्यांपेक्षा,
पेन ड्राईव्हच बरा आहे.

ट्रक असो वा पेन,
शेवटी ड्रायव्हर मोलाच ठरतो !
नाहीतर बोलाचीच कढी,
अन भातही बोलाचा ठरतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7867
दैनिक झुंजार नेता
10मार्च 2022
 

No comments:

जातीचे टोकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- जातीचे टोकन कुणाकडे ह्या जातीचे टोकन आहे, कुणाकडे त्या जातीचे टोकन आहे. ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाला, आ...