Showing posts with label संसारिक युद्ध... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label संसारिक युद्ध... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, March 6, 2022

संसारिक युद्ध... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संसारिक युद्ध

भांडून भांडून एकदाचे,
जगणे हराम करतात.
तेव्हा कुठे नवरा बायको,
आपला युद्धविराम करतात.

मित्रपक्ष होतो शत्रुपक्ष,
शत्रुपक्ष मित्रपक्ष होतो.
तेव्हा कुठे युद्धाचा,
तात्पुरता सोक्षमोक्ष होतो.

अधून-मधून चकमकी,
शीतयुद्धाचे मोह होतात !
पुन्हा नव्या युद्धापूर्वी,
तेवढ्यापुरते तह होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6428
दैनिक पुण्यनगरी
6मार्च 2022

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...