Showing posts with label बाई गं...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label बाई गं...मराठी वात्रटिका. Show all posts

Tuesday, March 8, 2022

बाई गं. ..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
बाई गं. ..
कालचे शिकारी उघड होते,
आजचे शिकारी फसवे आहेत.
सहज करतात बाजारात उभे,
एवढे ते बाजारबसवे आहेत.
कालचे जे ते सनातनी होते,
आजचे तर पुरोगामी आहेत.
कालचे तर बदनाम होते,
आजचे मात्र नामी आहेत.
बदललेत शत्रू बाई,
शोषणाचे नवे मार्ग आहेत!
नरकाच्या मार्गाने नेणारे,
त्यांचे मायावी स्वर्ग आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6431
दैनिक पुण्यनगरी
8मार्च 2022

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...