Showing posts with label उपरवाले की कृपा.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label उपरवाले की कृपा.... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, July 1, 2022

उपरवाले की कृपा.... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

---------------------

उपरवाले की कृपा

मी पुन्हा येईन,पुन्हा येईन,
असे हजारदा जप झाले.
ते खरोखर पुन्हा आले,
पण आता ते उप झाले.

त्यांच्या उपमर्दा मागे,
सगळे उपरवाले आहेत !
दिल्लीपासून गल्लपर्यंत,
डोळे पांढरे झाले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7970
दैनिक झुंजार नेता
1जुलै2022

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...