Showing posts with label एक दगड..दोन पक्ष.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label एक दगड..दोन पक्ष.... मराठी वात्रटिका. Show all posts

Sunday, July 24, 2022

एक दगड..दोन पक्ष.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

एक दगड..दोन पक्ष

तुमचा कानावर विश्वास नव्हता,
त्यांनी काळजावर दगड ठेवला आहे.
त्यांनीच जाहीर कबुली दिली,
असे नाही कुणी शोध लावला आहे.

त्यांना जसे हवे आहेत तसेच,
ते याकडे कबुलीकडे बघू शकतात!
काळजावरच्या दगडाचे,
नक्की नवे नवे अर्थ लागू शकतात !


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7996
दैनिक झुंजार नेता
24जुलै2022

 

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...