Showing posts with label नवी थीम... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label नवी थीम... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, October 21, 2022

बळी आणि राजा. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

बळी आणि राजा

शेतकऱ्यांच्या दुःखाचे,
तेंव्हा खूप हसू होत जाते.
जेंव्हा खालचे वरचे सरकार,
शेतकऱ्यांच्या विरोधात जाते.

शेतकरी हतबल झाला तरी,
शेवटी त्याचा तोच वाली असतो !
वामन फक्त वरच नाही,
आजकाल तो खाली असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8074
दैनिक झुंजार नेता
20ऑक्टोबर2022

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...