Tuesday, May 28, 2024

दैनिक वात्रटिका28मे2024....वर्ष- तिसरे..अंक -355 वा पाने -45


 दैनिक वात्रटिका
28मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -355 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

पुत्र व्हावा ऐसा गुंडा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुत्र व्हावा ऐसा गुंडा

कायदा,सुव्यवस्था,आरोग्य,
सर्व व्यवस्थांचा वाजवावा गंडा.
अगदी अल्पवयातच,
ज्याने त्रिलोकी लावावा झेंडा.

पळवावी कार; चिरडावेत लोक,
आजमावावा रॅप गाण्याचा फंडा.
असावा निर्दयी आणि निर्ढावलेला,
ज्याला लाजावा प्रत्यक्ष गेंडा.

बाप आणि आजोबाबरोबर,
घरादाराचा लावावा कडी- कोंडा !
उद्या प्रत्येक बिल्डर म्हणेल,
पुत्र व्हावा ऐसा गुंडा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8575
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28मे2024
 

Monday, May 27, 2024

दैनिक वात्रटिका27मे2024....वर्ष- तिसरे..अंक -354 वा


दैनिक वात्रटिका
27मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -354 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

सावधान....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सावधान....

जे जे राजकारणाने पेरले,
ते समाजकारणात उगवू लागले.
गावोगावाचे गावकारण,
गावाकडूनच नागवू लागले.

कुठे उगवण थोडीफार,
कुठे उगवण अगदी जोरात आहे.
गोडपणा जाऊन कडवटपणा,
आज गावोगावच्या सुरात आहे.

अजूनही वेळ गेली नाही,
ही विषपेरणी आवरू शकता !
उंटांवरच्या शहाण्यांची गरज नाही,
तुम्हीच तुम्हाला सावरू शकता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8574
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27मे2024
 

Sunday, May 26, 2024

दैनिक वात्रटिका26मे2024....वर्ष- तिसरे..अंक -353 वा पाने -45


दैनिक वात्रटिका
26मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -353 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

आचारसंहितेची वस्तुस्थिती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आचारसंहितेची वस्तुस्थिती

असून अडचण नसून खोळंबा
तिचेच नाव आचारसंहिता आहे.
गोंधळात गोंधळ वाढवणारी,
गाढवासमोर वाचलेली गीता आहे.

ज्यांनी आचारसंहिता पाळायची,
तेच सोयीनुसार मोडत असतात.
ज्यांचे काही देणे घेणे नाही,
नेमके तेच बळी पडत असतात.

आचारसंहिता पाळतो तो वेडा,
न पाळणाराच इथे शहाणा आहे !
ज्याला करायची उडवा उडवी,
त्याच्यासाठी आयताच बहाणा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8573
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26मे2024
 

Saturday, May 25, 2024

दैनिक वात्रटिका25मे2024....वर्ष- तिसरे..अंक -352वा


दैनिक वात्रटिका
25मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -352वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

दुष्काळ दर्शन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

दुष्काळ दर्शन

लोकसभेच्या निवडणुका संपताच,
राज्यातला दुष्काळ दिसू लागला.
आपल्याकडचे दुर्लक्ष बघून,
राज्यातला दुष्काळ हसू लागला.

दुष्काळावर निवडणुकीचे सावट होते,
आता आचारसंहितेचे सावट आहे.
दुष्काळाचे राक्षसी हास्य सांगते,
नेमके कोण कोण किती चावटआहे ?

टँकर लॉबीला दुष्काळाची,
दुष्काळाला पाण्याची तहान आहे !
मीडियावाल्यांसाठी तर सर्वांपेक्षा,
फक्त राजकारणच महान आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8572
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25मे2024
 

Friday, May 24, 2024

दैनिक वात्रटिका24मे2024....वर्ष- तिसरे..अंक -351 वा


 दैनिक वात्रटिका
24मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -351 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

निवडणूक खर्च..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

निवडणूक खर्च

कायद्याच्या हातानेच,
कायद्याला पाणी पाजले जाते.
निवडणूक खर्च मोजताना,
हातचे राखून मोजले जाते.

लाखांमध्ये खर्चलेले,
शेकड्यामध्ये मोजले जातात.
खर्चाच्या रकान्याचे,
तीन तेरा वाजले जातात.

अमाप पैसा खर्चूनसुद्धा,
खर्च मर्यादा पाळली जाते !
मतदारांना वाटलेली रक्कम,
मोजायची मात्र टाळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8571
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24मे2024
 

Thursday, May 23, 2024

दैनिक वात्रटिका23मे2024....वर्ष- तिसरे..अंक -34

दैनिक वात्रटिका
23मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -34
50 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

भ्रष्टाचाराच्या व्याख्या ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भ्रष्टाचाराच्या व्याख्या

एखाद्याचे हात ओले केले की,
त्याला खर्चा पाणी म्हटले जाते.
भ्रष्टाचाराचे प्रकरण असे,
टेबलाखालीच मिटले जाते.

काय खाल्ले ? किती खाल्ले ?
याच्यावरती किंमत बेतली जाते.
शेकड्यातला व्यवहार रोकड्यात,
म्हणजे चिरीमिरी घेतली जाते.

लाखात आणि कोटीत घेतले की,
करप्शन म्हणायला हरकत नाही !
काडीने खाल्ला किंवा बचकीने,
लाचेच्या पैशाला बरकत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8570
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23मे2024
 

Wednesday, May 22, 2024

दैनिक वात्रटिका22मे2024....वर्ष- तिसरे..अंक -349 वा


दैनिक वात्रटिका
22मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -349 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

लोकशाहीचा लोकोत्सव ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लोकशाहीचा लोकोत्सव

कुणी कुणी दाबल्या नोटा,
कुणी कुणी नोटाचे बटण दाबले.
कुणी कुणी ढोसली दारू,
कुणी कुणी पोटभर मटण दाबले.

कुणी कुणी जातीला जागले,
कुणी कुणी धर्माला जागले आहे.
कुणी कुणी आश्वासनाला भाळले,
कुणी केल्या कर्माला जागले आहे.

कुणावर सक्ती;कुणाची भक्ती,
कुणी लोकशाहीला मुजरा केला !
कुणी आवडीने;कुणी सवडीने,
लोकशाहीचा उत्सव साजरा केला !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8569
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22मे2024
 

Tuesday, May 21, 2024

दैनिक वात्रटिका21मे2024....वर्ष- तिसरे..अंक -348 वा


दैनिक वात्रटिका
21मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -348 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

श्रद्धा आणि अवडंबर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

श्रद्धा आणि अवडंबर

कुणी कुणी फोडले नारळ,
कुणी कुणी केल्या पूजा.
बॅलेट युनिट बोले कंट्रोलला,
बघ आहे की नाही मजा?

लावला गुलाल; वाहिली फुलं,
मतदान केंद्रावर पूजा अर्चा आहे.
आचारसंहिता भंगाइतकीच,
व्हीव्हीपॅटचीही चर्चा आहे.

लोकशाहीवर श्रद्धा असावी,
त्याचे असे अवडंबर करू नका !
आपल्या हक्काची बोंब मारीत,
लोकशाहीला गृहीत धरू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8568
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21मे2024
 

Monday, May 20, 2024

दैनिक वात्रटिका20मे2024....वर्ष- तिसरे..अंक -347 वा


दैनिक वात्रटिका
20मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -347 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

आचारसंहिता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आचारसंहिता

निवडणूक आचारसंहिता,
जणू फक्त सांगण्यासाठी असते.
निवडणूक आचारसंहिता,
जणू फक्त भंगण्यासाठी असते.

आचारसंहितेच्या नशेमध्ये,
जशी निवडणूक झिंगली जाते.
तशी कळत नकळत,
आचारसंहिताही भंगली जाते.

आचारसंहिता भंगाला,
वाटा पळवटांचा आसरा असतो !
जो पाळतो त्यांच्यासाठीच,
आचारसंहितेचा कासराअसतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8567
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20मे2024
 

Sunday, May 19, 2024

दैनिक वात्रटिका19मे2024....वर्ष- तिसरे..अंक -346 वा


 दैनिक वात्रटिका
19मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -346 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

घरफोडीचा पंचनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

घरफोडीचा पंचनामा

ज्यांनी घातला दरोडा,
त्या दरोडेखोरांचे अपील आहे.
आम्ही दरोडा घालणारच,
जिथे घरमालक गाफील आहे.

ह्या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,
असे आपल्याला वाटू शकते.
दरोडेखोरांचे प्रतिपादनही,
आपल्याला नक्की पटू शकते.

ज्यांचे घर फुटले त्यांना सांगा,
सगळ्या वैऱ्याच्याच राती आहेत !
जमादारखान्याच्या किल्ल्याही,
हल्ली चोरांच्याच हाती आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8566
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19मे2024
 

Saturday, May 18, 2024

दैनिक वात्रटिका18मे2024....वर्ष- तिसरे..अंक -345 वा


दैनिक वात्रटिका
18मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -345 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

क्लीन चीट ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

क्लीन चीट

आधी चिखलफेक केल्याशिवाय,
कुणाला क्लीन चिट देता येत नाही.
राजकारण समजल्याशिवाय,
प्रकरण नीट समजून घेता येत नाही.

क्लीन चिट देणारे आणि घेणारे,
क्लीन चिटला नवे नवे रंग देतात.
तेव्हा तुमच्या आमच्यासारख्याचे,
प्रचंड असे अपेक्षाभंग होतात.

क्लीन चीट कुणाचीही असली तरी,
तिला प्रत्यक्ष काळाचा शाप असतो !
क्लीन चीट देणारा आणि घेणाराही,
आळीपाळीने एकमेकांचा बाप असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8565
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18मे2024
 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...