Thursday, June 12, 2025
बाप नावाचा ताप...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
बाप नावाचा ताप
अखेर लेकराच्या बोलण्याचा,
प्रत्यक्ष बापालाच ताप झाला.
लेकराचा पोरकटपणा,
तेव्हा थोडाफार माफ झाला.
जरी आपलीच भाषा आहे,
जरी आपलीच बोली आहे.
तरी बाप नव्हे लोकसेवक,
व्याख्याच उलटी केली आहे.
कुणाचेही आईबाप काढणे,
मुद्दा साधासुधा ठरत नसतो !
काय म्हणायचे होते?काय नाही?
याला काहीच अर्थ उरत नसतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8945
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12जून2025
Wednesday, June 11, 2025
धिक्कार असो !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
धिक्कार असो !
तुमच्यासाठी स्वातंत्र्याची,
श्रीमंतीही भिक्कार आहे.
विकृतीला संस्कृती म्हणणाऱ्यांचा,
अगदी जाहीर धिक्कार आहे.
विकृतीची स्वीकृती म्हणजे,
कर्तव्याची खिल्ली आहे.
आपल्याच मूलभूत हक्कांची,
आपल्याकडून पायमल्ली आहे.
आपल्या असंविधानिक वृत्तीची,
कधीतरी वाचा फुटली पाहिजे !
किमान आपल्या दांभिकतेची,
आपल्याला लाज वाटली पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8944
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11जून2025
Tuesday, June 10, 2025
दैनिक वात्रटिका l 10 जून2025वर्ष- पाचवेअंक - 10 वा l पाने -60
स्टेटसचे टायमिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
स्टेटसचे टायमिंग
कुणाचे स्टेटस जेवढे खोचक,
तेवढेच ते जाचक असतात.
कुणा कुणाचे स्टेटस मात्र,
बरेच काहीसे सूचक असतात.
कुणाचा वेगळीकडे निशाणा,
कुणाचा वेगळीकडे तीर असतो.
कुणाचा स्वभाव उतवळा,
कुणाचा स्वभाव मात्र स्थिर असतो.
राजकीय व्यक्तीचे असेल तर,
स्टेटस नीटपणे जोखावे लागते !
नाहीच जुळून आले टायमिंग तर
सहन करायला शिकावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8943
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10 जून2025
Monday, June 9, 2025
दैनिक वात्रटिका l 9 जून2025वर्ष- पाचवेअंक - 9 वा l पाने -60
फसवी आशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
फसवी आशा
महाराष्ट्राच्या भल्यासाठी,
त्यांची म्हणे एकी आहे.
जनतेची खात्री पटली,
ही सगळी फेकाफेकी आहे.
स्वतःच्या भल्यासाठी वेगळे,
स्वतःच्या भल्यासाठी एक आहेत.
त्यांची त्यांनाच खात्री नाही,
आपले इरादे खरच नेक आहेत?
यायचे ते एकत्र येतील,
उगीच आशा लावून बसू नका !
स्वतःच्याच फसवणुकीवर,
दर निवडणुकीला हसू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8942
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 जून2025
Sunday, June 8, 2025
दैनिक वात्रटिका l 8 जून2025वर्ष- पाचवेअंक - 8 वा l पाने -60
आका... साप्ताहिक वात्रटिका
एका लेखाचा लेखाजोखा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
एका लेखाचा लेखाजोखा
एकाच मतदारांची नावे म्हणे,
अनेक ठिकाणी मिक्स होती.
महाराष्ट्र विधानसभेची,
निवडणूक म्हणे फिक्स होती.
मतदार यादीबरोबर मतदानाची,
म्हणे टक्केवारीही फुगली होती.
विश्वासार्हता आणि पारदर्शकता,
याचीही म्हणे वाट लागली होती.
एक्स हॅण्डल वरच्या लेखाला,
विरोधक वाय झेड ठरवू शकतात !
लेखाला लेखाने उत्तर देऊन,
लोकशाहीला डोक्यावर
मिरवू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8941
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8 जून2025
Saturday, June 7, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 जून2025वर्ष- पाचवेअंक - 7 वा l पाने -60
जिहाचा नारा.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
गद्दारीचे चक्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
गद्दारीचे चक्र
आज जो नाराज दिसतो,
तोच उद्याचा गद्दार असतो.
तिकडून आणि इकडूनही,
एकमेकांचा उद्धार असतो.
गद्दारी एकीकडूनच नाही,
ती सगळीकडून होते आहे.
उद्धाराचे आणि गद्दाराचे,
अगदी पारंपरिक नाते आहे.
जुन्या गद्दारीतून नवी गद्दारी,
सतत उदयाला येत असते !
राजकीय समीकरणसुद्धा,
त्यामुळेच संतुलित होत असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8940
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 जून2025
Friday, June 6, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 6 जून2025वर्ष- पाचवेअंक - 6 वा l पाने -60
अस्वस्थता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
अस्वस्थता
कुणाला एकत्रीकरणाची भीती,
कुणाला फाटाफुटीची भीती वाटते आहे
ज्याचा त्याचा फायदा तोटा सांगतो,
कुणाला कशी आणि किती वाटते आहे?
जसे काहीजण जोडायला बघत आहेत,
तसे काहीजण फोडायला बघत आहेत.
ज्यांची वाढली राजकीय अस्वस्थता,
ते तर शेंडाच खुडायला बघत आहेत.
ज्याच्या त्याच्या अस्वस्थतेचे,
राजकीय कारण वेगवेगळे आहे !
अस्वस्थतेला स्वस्थतेचा चेहरा,
याच्यामध्येच सगळेच्या सगळे आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8939
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 जून2025
Thursday, June 5, 2025
आजचा अंकदैनिक वात्रटिका l 5 जून2025वर्ष- पाचवेअंक - 5 वा l पाने -60
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 5 जून2025
वर्ष- पाचवे
अंक - 5 वा l पाने -60
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1JJdgrULIXv4VeIYt7McydKi2Yvv6hpuv/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 78
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) भूमिका
4) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
5) बाल वात्रटिका
6) वाचकांचे अभिप्राय..
7) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
आंखो देखा हाल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
आंखो देखा हाल....
चॅनलवरच्या पॅनलची चर्चा,
रस्त्यावरची भांडणं वाटू लागली.
गाढवांबरोबर डुकरही,
त्या उकांड्यावरती भेटू लागली.
चर्चा नावाच्या आरडाओरड्याला,
आक्रस्ताळेपणाची जोड असते.
आपलेच घोडे दामटण्याची,
चॅनल आणि पॅनलला खोड असते.
ना गवसतो सूर कधी,
ना चर्चांना कसला दर्जा आहे !
टक्केवारीत काढलेले निष्कर्ष,
हीच चॅनलवाल्यांची ऊर्जा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8938
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 जून2025
Wednesday, June 4, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 4 जून2025वर्ष- पाचवेअंक - 4था l पाने -60
फेस ना पाणी!...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
फेस ना पाणी!
फाटाफूट आणि एकत्रीकरणाची,
रोज नवी नवी आकाशवाणी आहे.
वाळू आहे साक्षीला,
कुठेच ना फेस,ना पाणी आहे.
फाटाफूट आणि एकत्रीकरणाच्या,
फक्त बातम्या रंगवल्या जातात.
सूत्रांचा हवाला देऊन देऊन,
लोक त्यातच गुंगवल्या जातात.
राईचा पर्वत करून करून करून,
त्यातून उंदीरसुद्धा काढला जातो !
सूत्रांच्या हाती सूत देऊन,
स्वर्गसुद्धा बिनधास्त ओढला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8937
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 जून2025
Tuesday, June 3, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 3 जून2025वर्ष- पाचवेअंक - 3 राl पाने -60
मूलभूत परिवर्तन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
मूलभूत परिवर्तन
समस्या कुणाला सोडवायच्या नाहीत,
फक्त फांद्या हलवीत बसायचे आहे.
अनिष्ट परंपराचे उदात्तीकरण करून,
फक्त दुसऱ्यावरतीच हसायचे आहे.
हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा,
मुंगी होऊन साखरेवरती ताव आहे.
थोडेसे पुढे जाऊन जास्त मागे येणे,
यालाच समाज सुधारणेचे नाव आहे.
वैयक्तिक आयुष्यात बदल करा,
सामाजिक सुधारणा होत राहतील !
याचीच सामाजिक मूल्ये होऊन,
नव्या पिढ्या आदर्श घेत राहतील !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8936
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 जून2025
Monday, June 2, 2025
दैनिक वात्रटिका l 2 जून2025वर्ष- पाचवेअंक - 2राl पाने -57
मान्सून 2025 ...साप्ताहिक वात्रटिका
महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...

















