आजची वात्रटिका
-------------------
गद्दारीचे चक्र
आज जो नाराज दिसतो,
तोच उद्याचा गद्दार असतो.
तिकडून आणि इकडूनही,
एकमेकांचा उद्धार असतो.
गद्दारी एकीकडूनच नाही,
ती सगळीकडून होते आहे.
उद्धाराचे आणि गद्दाराचे,
अगदी पारंपरिक नाते आहे.
जुन्या गद्दारीतून नवी गद्दारी,
सतत उदयाला येत असते !
राजकीय समीकरणसुद्धा,
त्यामुळेच संतुलित होत असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8940
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 जून2025

No comments:
Post a Comment