Wednesday, June 18, 2025

पक्षांतराचा (बाजार) भाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
पक्षांतराचा (बाजार) भाव
कुणी म्हणतो पक्षाचा प्रभाव आहे,
कुणी म्हणतो पक्षाचा दबाव आहे.
जे जे राजकारणी पक्षांतर करतात,
त्यांच्यात स्थैर्याचा आभाव आहे.
राजकीय स्थैर्यासाठी धावाधाव आहे,
तिकडे पळापळ जिकडे वाव आहे.
चोरांच्या टोळीतूनच आवाज येतो,
आमच्यातला प्रत्येकजण साव आहे.
प्रत्येकाकडून साव पणाचा आव आहे,
स्वार्थालाही परमार्थाचे नाव आहे !
लागते तेवढी बोली प्रत्येकासाठी,
आज जेवढा ज्याचा बाजारभाव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8951
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18जून2025

 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...