Wednesday, June 25, 2025

राजकीय प्रयोग....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

राजकीय प्रयोग

कुणासोबत जावे? कुणासोबत नाही?
सगळ्यांची एकसारखी स्थिती आहे.
तरीही राजकीय जुळवा जुळवीला,
सगळीकडे एकसारखीच गती आहे.

कुणाचे पाय तळ्यात मळ्यात,
कुणाचे दोन्ही डगरीवर हात आहेत.
फासलेले राजकीय प्रयोग,
पुन्हा पुन्हा करायला जात आहेत.

त्यांच्या राजकीय प्रयोगाला,
ना नियम,ना कसल्या अटी आहेत !
वरवरची जुळवा जुळवी तरी,
आतून मात्र फटीच फटी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8958
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
25जून2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...