आजची वात्रटिका
------------------
हा म्हणतो,मीच खरा बाप आहे,
तो म्हणतो,मीच खरा बाप आहे.
पक्ष कोणताही असला तरी,
त्याला गटा - तटाचा शाप आहे.
गटातटाच्या राजकारणात,
मान अपमान गिळावा लागतो.
कितीही जळफळाट झाला तरी,
वरचा आदेश पाळावा लागतो.
कधी यांना भाव जास्त असतो,
कधी त्यांना भाव जास्त असतो !
गटात-तटाच्या राजकारणाला,
हाय कमांडचाच वरदहस्त असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8934
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1जून2025

No comments:
Post a Comment