आजची वात्रटिका
-------------------
पास नापास
प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर,
पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागतात.
येणारे आणि जाणारेही,
सगळ्यांचीच परीक्षा पाहू लागतात.
निष्ठा निष्ठा असली तरी,
निष्ठा अनेक ठिकाणी वाहिली जाते.
स्वतः कसोटीवर उतरण्यासाठी,
खरी परीक्षा तर जनतेची पाहिली जाते.
आपल्या निष्ठेच्या समर्थनासाठी,
इतरांच्या गद्दारीचे दाखले दिले जातात !
निष्ठेच्या तकलादु कसोटीवर,
कुणी पास किंवा नापास केले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8950
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17जून2025

No comments:
Post a Comment