Saturday, June 7, 2025

जिहाचा नारा.... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
-----------------------

जिहादचा नारा

धार्मिक राजकारणाचा, 
निवडणुकीभोवती फेरा आहे. 
लव्ह जिहाद सोबतच,
लव्ह व्होटचा नारा आहे.

परस्परांच्या राजकीय शहाला,
परस्परांच्या काटशहाची दाद आहे.
कुणाचा उघड;कुणाचा छुपा,
जिहाद एके जिहाद आहे.

धार्मिक राजकारणाला, 
जातीपातीचाही प्रचंड ओढा आहे !
जाती-धर्माच्या चाकावरतीच, 
आपल्या लोकशाहीचा गाडा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------
साप्ताहिक सरकारनामा
1ऑक्टोबर 2024

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...