Monday, June 2, 2025

मान्सून 2025 ...साप्ताहिक वात्रटिका




साप्ताहिक वात्रटिका
----------------
मान्सून 2025
पाऊस ढग फोडीत आला
आपले विक्रम मोडीत आला,
यंत्रणेला भागदाड पाडून,
नको तिथे पाणी सोडीत आला.
वेधशाळेला अंदाज आला नाही,
पंचांगाला उलगडा झाला नाही.
तथाकथित हवामान तज्ञांच्या,
आहारीसुद्धा पाऊस गेला नाही.
हवामान बदल हा आडाखा आहे,
परंपरेला पावसाचा तडाखा आहे !
तुम्ही बदललात;मीही बदललो,
पावसाचा धडाक्यावर धडाका आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
साप्ताहिक सरकारनामा
31मे 2025

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...