Friday, June 27, 2025

सत्तांधता ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

सत्तांधता

सत्ता उतायला लागते,
सत्ता मातायला लागते.
आपल्याच मायाजालात,
सत्ता गुतायला लागते.

सत्ताधारी अंध होतात,
सत्ताधारी धुंद होतात.
सारासार विवेकाचे दरवाजे,
नकळत बंद होतात.

सत्ता बडबडायला लागते,
सत्ता धडधडायला लागते !
सत्ता पेलली नाही की,
सत्ता गडगडायला लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8960
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27जून2025
 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...