साप्ताहिक वात्रटिका
--------------------
युद्ध प्रसंग
एकदा नेत्यांनी तह केले की,
कार्यकर्त्यांना शस्त्रसंधी करावी लागते.
खुमखुमी असली किंवा नसली तरी,
कार्यकर्त्यांना युद्धबंदी करावी लागते.
कार्यकर्ते म्हणजे पक्षाची सैनिक,
त्यांना फुक म्हटले की फुकावे लागते.
पक्षीय सेनापती कडून आदेश आला की,
निर्णायक क्षणीही शस्त्र टाकावे लागते.
नेते कधी तळ्यात,कधी मळ्यात,
कधी कधी तर नेते खळ्यात असतात !
कार्यकर्ते भिडतात, कार्यकर्ते लढतात,
विजयाचे हार नेत्यांच्या गळ्यात असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------
साप्ताहिक सरकारनामा
28जून 2025
No comments:
Post a Comment