आजची वात्रटिका
-------------------
अघोरी मंत्र
कशीही मिळवा सत्ता मिळवा,
सत्तेचा मार्गच अघोरी आहे.
उपाय करा, अपाय करा,
त्याच्यात कसली चोरी आहे ?
म्हणूनच अघोरी मार्गाचीच,
अघोरी अशी विद्या आहे.
जिकडे तिकडे अघोरी प्रकार,
राजकारणात सध्या आहे.
अघोरी आहेत उपाय,
अघोरी त्याचे तंत्र आहे !
सत्तेसाठी वाट्टेल ते...
हाच आजचा अघोरी मंत्र आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8952
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19जून2025

No comments:
Post a Comment