आजची वात्रटिका
-------------------
सारेच चमत्कारिक !
योगायोग कोणताही असला तरी,
त्यामागे कार्यकारण भाव असतो.
योगायोगाला चमत्कार ठरविणे,
हा तर सुनियोजित असा डाव असतो.
काही चमत्कार तपासता येत नाहीत,
काही चमत्कार तपासून देत नाहीत.
चमत्काराची भांडेफोड होईल म्हणून,
भक्तसुद्धा कोणतीच रिस्क घेत नाहीत.
स्वार्थापोटी चमत्कार करवले जातात,
स्वार्थापोटी चमत्कार मिरवले जातात !
जे करतात चमत्कारांची चिकित्सा,
ते भ्रष्ट आणि नास्तिक ठरवले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8947
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14जून2025

No comments:
Post a Comment