आजची वात्रटिका
-------------------
गेम प्लॅन
सावात चोर आले,
आमची काही हरकत नाही.
पण चोरात साव गेले,
त्याशिवाय जणू बरकत नाही ?
हल्ली चोरांच्या भोवती,
सावांचाच जास्त पिंगा आहे.
त्यांनी चोरांना सामील व्हावे,
ही तर उलटी गंगा आहे.
चोर आणि सावांनाही,
एकमेकांचे भलतेच प्रेम आहे !
दोघांच्या युतीमध्ये,
तुमचा आमचा गेम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8946
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13जून2025

No comments:
Post a Comment