Monday, June 2, 2025

फिक्सिंगचे डावपेच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

फिक्सिंगचे डावपेच

राजकारण आणि क्रिकेटचे,
फिक्सिंगशी खूप अतूट नाते आहे.
जे आधीच ठरलेले असते,
आपल्याला वाटते ते आता होते आहे.

प्रत्येक गोष्टीची बोली लावून,
ज्याची किंमत त्याला दिली जाते.
एकदा मासा गळाला लागला की,
त्याची दामदुप्पट वसुली केली जाते.

फिक्सिंग येड्या गबाळ्याचे काम नाही,
सांगू,फिक्सिंगचे डावपेच कशात आहेत?
फिक्सिंग त्यांनाच चांगली जमते,
ज्यांच्या पंचसुद्धा खिशात आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8935
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 जून2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...