Thursday, June 26, 2025

माफीनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

माफीनामा

नको ते नको तसे अर्थ,
नको त्याच्या तोंडी घातले जातात.
सगळी मुस्कटदाबी करून,
जाहीर माफीनामे घेतले जातात.

दांभिकता आणि झुंडशाहीचे,
अनैतिक असे सुत आहे.
बळजबरीच्या माफीनाम्यांना,
आजकाल जास्तच ऊत आहे.

माफीमुळे कुणी छोटा होत नाही,
अशी कौतुकाची थाप मारली जाते !
अनैतिक एकीच्या जोरावरती,
सत्याला मात्र धूळ चारली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8959
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26जून2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...