Tuesday, June 24, 2025

भेसळीचे वास्तव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

भेसळीचे वास्तव

विचारांची आणि आचारांची,
मिसळा मिसळ झाली आहे.
राजकीय पक्ष म्हणजे,
सगळी भेसळ झाली आहे.

सगळ्या पक्षीय भेसळीची,
सगळ्यांनाच चटक आहे.
मिसळा मिसळ असली तरी,
जो तो तुटक तुटक आहे.

भेसळीच्या राजकारणाचा,
भैसळीनेच सामना आहे !
सलामत रहे दोस्ताना हमारा,
सर्वपक्षीय कामना आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8957
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24जून2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...